मंगलवार, 25 दिसंबर 2012

अर्धशतकी कर्तबगारी महाराष्ट्र टाइम्स

अर्धशतकी कर्तबगारी

महाराष्ट्र टाइम्स
११ ऑगस्ट १९९६

स्वातंत्रय मिळाल्यापासूनचे अर्धशतक, किंबुहना विसाव्या शतकातील भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या काळातील महिला कशा वागल्या, काय जिद्द घेऊन समाजपढे उभ्या राहिल्या आणि समाजाला त्यांनी काय आदर्श दिले, यावरही एक वियाव्या शतकातील स्त्रीचे भवितव्य आणि एकूण समाजाचा दृष्टिकोन समाजाची माणुसकी अवलंबून राहणार आहे. म्हणूनच या अधर्शतकातील ज्या महिलांनी समाजात काही करून दाखवले आहे, त्यांची कर्तबगारी पाहण्यासारखी आहे.

अशा ज्या महिलांची मला नांद करावीशी वाटते, त्यामध्ये अर्थातच सर्वप्रथम आहेत त्या श्रीमती इंदिरा गांधी , याशिवाय लता मंगेशकर अशा भोसले , अमृता प्रीतम, दुर्गाबाई भागवत, बच्छेन्द्री पाल, ऍना मल्होत्रा, नीरजा भानोत, राधा देवी , किरण बेदी , भंवरी देवी, पी.टी.ऊषा, सुजाता मनोहर, मेधा पाठकर, सुधा चन्द्रन, मदर टेरेसा, आशापूर्णादेवी, अनिता सूद अशी नावे माझ्या नजरेसमोर येतात. एका वेगळया अर्थाने जयललिता, मायावती फूलनदेवी ही नावेपण मला नोंदवावीशी वाटतात. या सर्वांनी त्यांच्या  त्यांच्या परीने आयुष्तात काही तरी भव्य असे मिळावलेले आहे. ते करताना प्रतिगामींच्या रोषाची, स्त्र्िायांनां आढकाठी करणाया प्रथांची पाय ओढणाच्या समाजाची झळदेखील त्यांनी सोसली आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्या स्वत्वाच्या बळावर झगडा देऊन मनातले ध्येय साध्य करून घेतले आहे. अनंत अमुची ध्येयासक्ती  हे वर्णन त्यांना सर्वाथाने लागू पडते. त्यांच्या सर्व गुणसमुच्चयापैकी मला सर्वांत जास्त भावलेला गुणा म्हणजे त्यांची जिद्द आणि हार जाण्याची त्यांची वृत्ती.

भ्रष्टाचाराचे गालबोट           

श्रीमती इंदिरा गांधी अठरा वर्षे या देशाच्या पंतप्रधान होत्या. पंडित नेहरूंची कन्या या एकाच बिरूदामुळे त्या पंतप्रधान झाल्या , असे मला वाटत नाही. त्यांना स्वतःला स्वातंत्रयलढयाची पार्श्र्वभूमि होती. स्वातंत्रयानंतर नेहरूंचे राजकीय जीवन त्यांना जवळून पाहायला मिळाले होते. मंत्रिमंडळाचाही अनुभव होता. या भांडवलाच्या बळावर त्या पंतप्रधान झाल्या. त्यानंतर त्यांना कित्येक कणखर तर कित्येक तिकडमबाजीजे निर्णय घ्यावे लागले. त्यातील कित्येक निर्णय चुकले असतील, कित्येक आततायीपणाचे असतील, पण त्यांच्या दोन खंबीर निर्णायांची नोंद घ्यावी लागेल. एक म्हणजे बांगलादेशाच्या स्वातंत्रयलढयातील त्यांचे धाडसी निर्णय। शेख मुजिबूर रेहमान यांना पांठिबा देणे, अमेरिकेचे सातवे आरमार आधीच खेळी करून अडवणे आणि बांगलादेशामध्ये भारतीय सैन्याचा विजय. त्यांचा दुसरा खंबीर निर्णय होता, कुटुंब नियोजनाचा. स्वातंत्रय मिळण्याच्या वेळी जेमतेम २० कोटी असेलेली आपली लोकसंख्या आज १०० कोटींच्या घरात पोचत आहे आणि त्यात दर दोन ते तीन सेकंदाला एक अशी भर पडत आहे. यासाठीच कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम त्यांनी ज्या तडफेने राबवला, त्याची दखल घ्यावी लागेल. १९८० नंतर दुर्दैवाने कोणालाच ( त्यांना स्वतः लादेखील ) ही योजना पुन्हा सुरू करणे जमले नाही. ती समज कोणी दाखवू शकले नाही, असे म्हणावे लागेल. त्याच्याबरोबरच अन्नधान्याच्या बाबतीत हरित क्रातीमुळे देशाला मिळालेली देशाला मिळालेली स्वंयपूर्णता , यासाठी त्यांनी वैज्ञानिकांना दिलेले उत्तेजन लक्षात ठेवण्यासारखे आहे. अग्नी पृथ्वी सारखी क्षेपणास्त्रे , अण्टार्क्टिकावरील सशोंधन, अंतराल विज्ञानातील भारताची  प्रगती यासाठी वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप मदतीला आला. त्यांचा खंबीरपणा, प्रश्न  चटकन समजून घेण्याची वृत्ती , वाचन
बहुश्रुतपणा, धैर्य या गुणांची दखल केव्हाही घ्यावी लागेल. मात्र सार्वजनिक जीवनातील भष्टाचारला त्यांचा काळात राजमान्यता मिळाली. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी पाऊल उचलण्याऐवजी त्याचे समर्थन किंवा दुर्लक्ष त्यांनी राजकीय जीवनाचा घसरता प्रवाह सुरू झाला, असे मला वाटते. दुर्दैवाने देशातील लोकशाही आपल्या देशातील लोकशाही निवडणूक पद्धतीतच अशी व्यवस्था आहे जी भ्रष्टाचाराला खतपाणी घालते. स्वातंत्रयवीरांवची  पुण्याई संपून जसजशी नवी पिढी राजकारणात येऊ लागली. तसतसे राजकारणाचे व्यापारीकरण मग गुन्हेगारीकरण वाढू लागले. या प्रक्रियेला अगदी सुरूवातीलाच आळा घालणे त्यांना सुचले नाही आणि जमले नाही. नियोजनाची गरज जशी त्यांच्या लक्षात आली, तशी भ्रष्टाचारविरोधी गरज त्यांच्या लक्षात आली नाही किंवा तो काही खान्या अर्थाने त्यांचा राजकीय कार्यक्रम झाला नाही.

मानाचे सुरेल प्रतीक       

अपार मेहनत घेऊन नंतर अपार मिळवलेल्या भारतीय स्त्र्िायांमध्ये ज्या ठळकपणे उठून दिसतील. अशा दोन बहिणी आहेत - लता आणि आशा. त्यांच्या गळांची मोहिनी पूर्ण अर्धशतकभर चित्रपटसृष्टीवर राहिली आहे. देशाच्या कुठल्याही कोपन्यात जा, त्यांचं एखादं तरी गाणं अतिशय आवडीने गुणगुणलेलं ऐकायला मिळणारच . दोघींच्या गळयाची सहज सुरेलता आपल्याला खिळवून ठेवते. मग ते ताना घेताना असो की अत्यंत उडत्या चालीची गाणी असोत.त्यात विविधतापण आहे. गीतीचे अध्याय , मीरा भजने, तुलसी रामायणासारखे पाठ आहेत ; तसेच तामिळमल्याळमपासून आसामी - बंगाली गाण्यांपर्यंत, देशभरच्या सर्व भाषांत त्यांची गाणी गाऊन झालेली आहेत. असे म्हणात की, सर्व जगात समजली जाणारी एकच कोणती भाषा असेल, तर ती संगीताची भाषा. अशा संगीताद्वारे सर्व भारतीयांच्या अभिमानची गोष्ट बनल्या आहेत, त्या या दोन गायनसम्राज्ञी. येती अनेक वर्षे तरी पुढील गायिकांसाठी लता अशा यांचेच मापदंड लावले जाणार आणि प्रतिलता हा शेरा मिळावण्यासाठी इतर गायिका धडपडणार.

सर्व जगात बोलली, समजली जाणरी दुसरी भाषा म्हणजे प्रेम सेवेची. त्या क्षेत्रात मदर तेरेसा यांनी अतुलनीय काम करून हजारो व्यक्तींच्या जीवनात आशा आणि दिलाशाचे क्षण निर्माण केले. अशा कित्येक सेवाभावी व्यक्तींची देशाला गरज आहे पुढेही राहील. जेव्हा असे दुसन्यांचे संसार सांभाळणान्या स्त्र्िाया पुढे येतील, तेव्हा त्या प्रत्येक प्रसंगी मदर तेरेसांचे नाव घेतले जाईल. त्यांना नोबोल पुरस्कारही मिळाला. जगात हा पुरस्कार मिळवणान्या त्या तिसन्या महिला. पहिल्या दोघी वैज्ञानिक होत्या - मेरी क्यूरी (दोन वेळा ) आणि त्यांची मुलगी आयरिन. मात्र मदर तेरेसा नोबोल पुरस्कारापेक्षा त्यांच्या सेवाव्रतामुळेच ओळखल्या जातील.
          राजकीय क्षेत्रातील ठळकपणे पुढे आलेल्या श्रीमती विजयालक्ष्मी पंडित. या देशातील पहिल्या महिला राज्यपाल ! त्या विदुषी उत्तम वकत्या आणि पंडित मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू  यांच्या पठडीत तयार झालेल्या होत्या. त्यांनी रशिया , अमेरिका ब्रिटनमध्ये राजदूत म्हणून कसत पाहिले. तसेच सयुंक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या त्या एकमेव महिला अध्यक्ष होऊन गेल्या. त्यांच्याखेरीज देशात महिला मुख्यमंत्री म्हणून आधी श्रीमती नंदिनी सत्पथी नंतर श्रीमती शशिकला काकोडकर यांनीपण समर्थपणे काम पाहिले.

लता - अशा यांनी सिनेसंगीत गायले. पण शास्त्रोक्त संगीतात खूप चांगल्या गायिकांची नोंद घेण्यासारखी आहे. प्रत्येकीची पद्धत वेगळी. पण त्यांनी गाठलेल्या उंचीचा खडतरपणा आणि रूबाब त्यांच्या आयुष्याला सामान्य जीवनपेक्षा वेगळा संदर्भ देऊन जातो. शास्त्रीय गायनात मेहनतीने कमावलेला गोड गळा आणि मेहनत कमी पडल्याने मनाला खोलवर भिडू शकणारा गळा यातला फरक पटकन लक्षात येतो. अशा वेळी मेहनतीने तयार केलेल्या गळाची जी गायिका, तिच्या मेहनतीला दाद घावीशी वाटते. मी जरी शास्त्रीय गायनातील तज्ज्ञ
सुब्बलक्ष्मी, हिराबाई बडोदेकर, किशोरी आमोणकर आणि परवीन सुलताना यांची नावे मी घेईन.


मीना, वहिदा, स्मिता  

भारतात कलेच्या क्षेत्रात सिनेमा हे अत्यंत प्रभावी माध्यम ! आणि प्रसिद्धीच्या झोतात येणे हे सिनेकलांवतांना खूपच सोपे ! त्यांच्या कामाची सुरूवात मुळी प्रकाशझोतापासून होते. त्यामुळे सिनेमाक्षेत्रात नायिका म्हणून खूपजणी नाही ; म्हणून निकषांची चर्चा करता, पण माझी पसंती म्हणून मीनाकुमारी , वहीदा रेहमान, हेमामालिनी स्मिता पाटील ही नावे घेईन. भविष्यकालीन नायिकांनी त्यांच्याकडून बरेच शिकण्यासारखे आहे.

प्रत्यक्ष गीत गाणे आणि त्या गीताला चाल लावणे या दोन अगदी भिन्न कला आहेत. चाल लावण्यामध्ये गायकीच्या कलेखेरीज कल्पनासमृद्ध मनही हवे आणि व्यवस्थापनकौशल्यपण हवे ! अशा संगीत दिग्दर्शन व्यवसायात एकच स्त्री दिग्दर्शिका झाली. त्या म्हणजे उषा खन्ने! नुसत्या संगीत दिग्दर्शक नाही तर काही अत्यंत गोड चाली देणान्या संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख सिनेमा इतिहासात कायम राहील.

बंडखोर नायिकेची निर्माती

बालपणापासूनची माझी आवडती लेखिका म्हणजे अमृता प्रीतम! रणवीर झाशीच्या राणीची महती सांगणान्या आपल्या देशांत कथा कांदबन्यांमधल्या स्त्र्िाया रडक्या दुर्बल नाजुक अशाच का असाव्यात ? असा प्रश्न कित्येक नायिकांबाबात पडतो. पण अमृता प्रीतमच्या सर्व नायिका बंडखोर!मात्र त्या बंडात आक्रास्तळेपणा नसून, अत्यंत प्रगल्भ बुद्धिवाद आहे! जे सत्य आहे ते प्रकट करण्यात संकोच कशाला ? सत्य प्रकट होण्याने सर्वांच्या जीवनाला उजाळा मिळतो, त्यांत शरमून जाण्यासारखे काही नसते, अशी भूमिका त्यांच्या नायिका घेतात. जी स्त्री - पुरूष समानता त्यांच्या लिखाणात दिसून येते, ती दोघांनी सहज प्रवृत्तीने स्वाभाविकपणे बाळगलेली समानता असते. ती फक्त कर्तव्य म्हणून पत्करलेली समानता नसते. म्हणून त्यांच्या नायिकांचे विचारदेखील किरकोळ समस्यांच्या पुष्कळ पुढचे असतात. असाच काहीसा सूर-पण अमृता प्रीतमपेक्षा खूप जास्त आणि खूप विविध लेखन आहे आशापूर्णा देवींचे. पण त्यांचं कथाबीजही काळाच्या खूप पुढचे आणि जीवनात दुःख शाश्र्वत नसून, सुरख असतो असा ठाम विश्र्वास बाळगणारे! दुर्गाबाई भागवतांचे साहित्य अत्यंत आवडीचे असूनही त्यांचे नाव मात्र मी वेगळया संदर्भाने घेते. साहित्यिकाजवळ विचाराचे शस्त्र असते म्हणून इतर सर्वांच्या आधी त्याने अन्यायविरूद्ध आवाज उठवावा, असे आपण म्हणतो. त्याने स्वाभिमानी असावे, मिधे असू नये असे आपल्याला वाटते. आणीबाणीच्या काळात जेव्हा देशभरातील मी-मी म्हणणारे सगळे साहित्यिक गप्प बसले, तेव्हा दुर्गाबाईंनी 'मी साहित्यिक' या श्रेष्ठत्वाच्या नात्याने आणीबाणीच्या विरोधात भूमिका घेतली त्यासाठी तुरूंगवासदेखील सोसला. खरा विचारवंत अन्यायविरूद्धं कसा वागतो त्याचा एक वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आणि साहित्यिकाचे काम असेच असते, या भावनेतून घालून दिला, याबद्दल मला त्या त्यांच्या लेखनापेक्षा जास्त आदरणीय वाटतात.

माझ्या पहिल्याच शालेय पुस्तकात एवहरेस्ट विजेत्या शेरपा तेनसिगंचा धड़ा होता. असले धडे बालमनावर किती खोल ठसा उमटवतात, ते मी अनुभवले आहे. तो धडा उत्कटतेने पुन्हा आठवला, जेव्हा बच्छेंद्री पालचे नाव गाजले! तिने एव्हरेस्ट जिंकल्याचे मला समाधान वाटले. तिच्यावरसुद्धा कितीक धडे लिहिल जावेत आणि त्यांनीपण बालमनाला वेगळी स्वपने मिळवून द्यावीत. आता तिचे नावे कुठेच घेतले जात नसेल. पण कधीही तिचे नाव निघाले तर एव्हरेस्ट शिखरांचा लख्खपणाच माझ्या मनात पसरतो.
कर्तव्यासाठी जिवाचे दान      

मूर्तिमंत साहस प्रसंगावधान कोणाचे तर नीरजा भानोतचे. एअरहोस्टेस म्हणून डयूटी पत्करल्यानंतर प्रवाशांचे रक्षण ही आपली जबाबदारी मानून पाकिस्तानी हवाईचाच्यांना चकवून त्यासाठी स्वतःचा जीव गमावण्याची पाळी आली तेव्हा करून तिने जे अतुलनीय साहस दाखवले, त्याबद्दले सान्या जगाने तिचा गौरव
केला. आज तिच्या स्मरणार्थ भरतातील साहसी स्त्र्िायांना पारितोषिक दिले जाते. हीपण तिच्या साहसाला मिळालेली दुसरी पावती. आतापर्यन्त नीरजा भानोत पारितोषक ज्यांना दिले गेले. त्यापैकी दोघीजणी मला विशेष जास्त साहसी वाटतात. त्या म्हणजे भंवरीदेवी आणि राधादेवी.

भंवरीदेवी कथा म्हणजे पुन्हा एकदा द्रौपदी - दुःशासनाची कथा!पुरूषप्रधान संस्कृतीमधील सत्ता गाजवणान्यांच्या उद्दामपणाची चरमसीमा म्हणजे दुःशासन.त्या चरम उन्मत्ततेला हार जाता ओरडून ओरडून जगाकडे न्याय मागणारी, न्याय देऊ शकलेल्या जगाला थू म्हणून शरमवून टाकू शकणारी स्त्री म्हणजे द्रौपदी. भंवरीदेवीचा लढापण असाच द्रौपदीने दिलेला लढा आहे. मी माझ्याच गावात रहाणार. माझ्यावर अन्याय करणान्यांना शासन व्हावे म्हणून झगडत रहाणार, हा वसा घेतलेली भवंरीदेवी अत्याचारित स्त्र्िायासांठी आशेचा एक प्रखर झोत आहे. तिच्या खटल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा न्यायसंस्थेची कसोटी लागणार आहे. जळगाव, मालेगाव, दिल्ली आणि आता देशात सगळीकडे घडत असाणान्या प्रकरणामध्ये बळी पडलेल्या स्त्र्िायांना न्यायलयांनी ठरवायचे आहे. पण त्यांना झगडण्याची जिद्द मात्र भंवरीदेवीने दिलेली आहे.

एकीकडे भंवरीदेवी लढाई चालू असतानाच तितक्याच पराकाष्ठेने राज्यसंस्थेबरोबर झगडून इतर स्त्र्िायांसाठी न्याय मिळवून घेऊ शकलेली लढवरूया म्हणजे राधादेवी. एक सामान्य, श्रेणी एकमधील स्त्रीअधिकारी ; पण वसतिगृहातील रिमांड होममधील स्त्र्िायांचा वापर राज्यकर्त्यांच्या भोगविलासासाठी केला जातो, तो थांबण्यासाठी या बाई झगडल्या!त्यांना 'मेंटल केस' घोषित करून पाागलखान्यांत छेवले, तरी त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत पाँडिचेरीच्या मुख्यमंत्र्यांसंकट सर्व राज्सकर्ते आणि नोकरशाहीबरोबर झुंज दिली. या झुंजीतील त्यांची जिद्द जेवढी मनाला फुलवाणी तेवढीच सरकारची संवेदनहीनता मनाला भिववणारी.

एकीकडे भवंरीदेवीची लढाई चालू असतानाच तितक्याच पराकाष्ठेने राज्यसंस्थेबरोबर झगडून इतर स्त्र्िायांसाठी न्याय मिळवून घेऊ शकलेली लढवयया म्हणजे राधादेवी. एक सामान्य श्रेणी एमकधील स्त्रीअधिकारी ; पण वसतिगृहातील रिमांड होममधील स्त्र्िायांचा वापर राज्यकर्त्यांच्या भोगविलासासाठी केला जातो, तो थांबण्यासाठी या बाई झगडल्या ! त्यांना 'मेंटल केस' घोषित करून पागलखान्यांत ठेवले, तरी त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत पाँडिचेरीच्या मुख्यमंत्र्यासंकट सर्व राज्यकर्ते आणि नोकरशाहीबरोबर झुंज दिली. या झुंजीतील त्यांची जिद्द जेवढी मनाला फुलवणारी तेवढीच सरकारची संवेदनहीनता मनाला भिववणारी.

नशिबाजी झुंजणारी सुधा

प्रखर जिद्दीचा असाच एक नमुना म्हणजे सुधा चंद्रन ! तिची झुंज होती तिला हताश करू पाहणान्या नशिबाशी आणि त्यात तिने विजयश्री मिळवली ! नृत्यकलेत सुधा चंद्रन अगदी नंबर एक नसेल, पण तिचा नंबर फार खालचाही नाही. तुटक्या पायाला जयपूर फूट बसवून त्यावर नृत्याचा रियाज पुन्हा सुरू करून आणि त्यात प्रावीण्य मिळवून तिने नशिसवर मात केली, तेव्हा तिला नशिबाने नक्की कुर्निसात केला असणार!


ऑलिंपिक क्रीडास्पर्धा म्हणजे सर्व जगातील क्रीडा-कौशल्याला आव्हान. हे आव्हान पेलू शकलेली जी अत्यंत थोडी भारतीय खेळाडू मंडळी आहेत, त्यात महिलावर्गाचे प्रतिनिधित्व करू शकली, ती फक्त एकच - सुवर्णकन्या पी.टी.उषा ! स्वतंत्र भारताच्या पहिल्या पन्नास वर्षांच्या खेळ-इतिहासात महिलांसाठी एकच पान असेल. ते तिचे तिच्याबरोबर सर्वप्रथम फ्रेंच खाडी पोहणारी तैराक आरती सहा कमीत कमी वेळात जगातली मोठी खाडी पोहणारी अनिता सूद या भारतीय जलतरणपंटूचे नावही महत्वाचे पुढील कालखंडात मानाचे ठरावे.

मूक दुःखाचा आवाज

सामाजिक न्यायसाठी वर्षानुवर्षे जिद्दीने लढणारी महिला म्हणून जे नाव पहिल्या बसेल, ते म्हणजे मेधा पाटकर. नर्मदा धरणातील विस्थापितांच्या मौन दुःखाला त्यांनी वाचा दिली. लोकशाहीत लोकांच्या हक्कांसाठी प्रसंगी आपल्याच सरकारशी भांडावं लागतं। अशावेळी कुणाची बाजू बरोबर, असा संभ्रमपण मनात निर्माण होऊ शकतो. अशा वेळी आपल्याला पटणान्या भूमिकेसाठी लोकांनी झगडा उभारणे शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. अन्यथा या संकल्पनेवरील लोकांचा विश्र्वासच उडून चालला होता. या लढयात त्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्याशी असहमती दाखवणारे सरकारी अधिकारीसुद्धा कबूल करतात की हा लढा झाला नसता तर पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे समग्रपणे पाहण्याची जी दृष्टी आज येत आहे, ती आली नसती ! स्वीडनसारख्या देशाने प्रति नोबेल पारितोषिक देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला;तर जागतिक बँकने पुनर्वसनाबाबतची आपली भूमिकाच बदलून टाकली. या नावनी भूमिकेतून थेट कोयना धरणग्रस्तांपासूनाच्या सर्वांचा पुनर्विचार व्हावा, असे आता जागतिक बँकेचे सांगणे आहे.

स्वातंत्र्यांनतरच्या काळात स्त्र्िाया झपाटयाने नोकरीत येऊ लागल्या. तशा त्या भारतीय प्रशासकीय सेवेत, पोलिसदलात न्यायदानाच्या क्षेत्रातही आल्या. अगदी १९५१ मध्येच प्रशासकीय सेवेत महिला आय.ए..एस. अधिकारी म्हणून नंतरही अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्रीमती ऍना मल्होत्रा यांचे नाव
घेतले जाईल. तर १९५३ मधे सेवेत आलेल्या श्रीमती त्रिवेदी या पहिल्या महिला चीफ सेक्रेटरी !(हा बहुमान मेघालय आसाम या राज्यांनी पटकावला) तसेच मध्य प्रदेशात महिला चीफ सेक्रेटरी  म्हणून श्रीमती बुच होऊन गेल्या. देशात या सेवेत १९४९ पासून सुमारे ५००० च्या आसपास अधिकारी झाले. त्यापैकी सुमारे ५०० महिला अधिकारी झल्या. यातही १९५० ते १९७० या पहिल्या वीस वर्षांत प्रत्येक राज्यांत एक किंवा दोन देशभरात जेमतेम वीस महिला अधिकारी झाल्या. त्यांची दखल फार कमी घेतली गेली.कारण सनदी नोकरशाहीचा पहिला नियम हा की सनदी अधिकान्याने निनावी रहावे. त्याच्या उत्तम कामगिरीची दखल फक्त त्याच्या वरिष्ठांनी घ्यावीः बस्‌ ! त्यामुळे त्यांनी जे उत्तम काम केले असेल, आदर्श कार्य-व्यवस्था निर्माण केली असेल, चांगली धोरणे तयार करून राबवली असतील, तर त्यांचीही नांद नाही. कुण्या चांगल्या लेखकाने १९७० च्या अगोदर प्रशासकीय सेवेत आलेल्या महिलांच्या मुलाखती घेऊन नोंदवून ठेवल्या, तरच त्यांच्या कर्तृत्वाची नोंद इतिहासात राहील, अन्यथा नाही.

उपेक्षित क्षेत्रातही चमक

पोलिसदलात किरण बेदी या पहिल्या महिला आय.पी.एस.! १९७२ मध्ये त्या नोकरीत आल्या, त्याचमुळी प्रसिद्धीच्या झोतात. करण या पदाच्या परीक्षेसाठी फक्त पुरूषांना परवानगी असे. त्या कलमालाच न्यायालात आव्हान देऊन, केस जिंकून, त्यांना या सेवेत येता आले. भारतीय प्रशासकीय सेवेच्या सुमारे वीस वर्षांनंतर भारतीय पोलिससेवेत पहिली महिला अधिकारी आली. नुसतीच पहिली महिला म्हणून नव्हे, तर कर्तव्यदक्ष
असूनही जिला वरिष्ठांबरोबर झगडून त्यांचा रोष पत्करावा लागला, भांडावं लागलं, अशी पोलिस अधिकारी !विशेष म्हणजे तिला दिल्ली येथे तुरूंग महानिरीक्षकासारखे एक टाकावू अधिकारपद दिले. आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर सुधारकाची भूमिका घेऊन तिने या पोस्टिंगचे चीज करून दाचावले. इतके की तुरूंग सुधारणेच्या कामासाठी तिला मॅगसेसे पुरस्कार मिळाला ! तसे म्हटले, तर प्रशासनात बदली हा नेहमीच अनेक पैलू विषय मानला गेला आहे. काही अधिकारी सर्व अधिकारपदांची विभागणी 'ग्लेंमरस' आणि 'टकाऊ' अशी करतात ज्याला 'ग्लेंमरस पोस्टिंग' मिळेत तोच यशस्वी नोकरशहा असा मापदंड लावतात. इतर काही अधिकारी मानतात की प्रत्येक पदावर गाळ उपसण्याचे काम सारखेच असते, तसेच आव्हान देणारेही काहीतरी असतेच. ते आव्हान स्वीकारणारे अधिकारी निराळे आणि त्याने निराश होणारे अधिकारी निराळे. मात्र ज्याला आव्हान स्वीकारायचे असेल त्याला खूप कष्ट 'गाढव मेहनत' म्हणावे असे कष्ट करावे लागतात. ज्यांचे हे सर्व कष्ट लोकांपर्यंत पोचत नाहीत, त्यांना प्रसिद्धीचे वलय मिळत नाही. किबहुना प्रसिद्धीपासून मागेच रहायचे असते. हा सनदी नोकरांच्या बाबत संकेत आहे. तो किरण बेदीने पाळला नाही असाही काहींचा आक्षेप असेल. तरीही आय.पी.एस. अधिकारी म्हणून धैर्य, कर्तव्यपालन, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, कष्टाला हार जाणे निराशेला मनात थारा देणे हे गुण तिच्या कारकिर्दीत दिसून आले आणि लोकांनी तिला यशाची पावती दिली.

पोलिस सेवेल पहिली महिला अधिकारी आल्याच्याही वीस वर्षांनंतर सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयांत महिला न्यायधीश आल्या, त्या श्रीमती सुजाता मनोहर. पण त्यांच्यानंतरी पोकळी आहेच आणि अजनूही विभिन्न राज्यतील उच्च न्यायालयांत मोठया प्रमाणावर महिला न्यायधीश दिसत नाहीत.

सदगुणांचे मापदंड

प्रसिद्धीचेय वलयात अजून तीन स्त्र्िाया आहेत जयललिता, मायावती आणि फूलनदेवी, पैकी जयललिता यांच्या भ्रष्टाचाराच्या, हुकूमशाहीच्या, दिखाऊ उधळपट्टीच्या कथा गाजतील, तर मायावतीबाबत एक आक्रस्ताळी प्रशासक असे बोलले जाईल. असे सामान्यपणे लोकांना वाटते. या दोघींकडे बोट दाखवून लोक चर्चा करतात, 'पहा हो, महिलांच्या हाती राज्य गेलं तर भ्रष्टाचार आणि आक्रस्ताळेपणा कमी होईल. असं वाटत होत. पण त्याही तसल्याच ! महिला असून असं करण शोभतं का त्यांना?' म्हणजे सदगुणांचा पुतळा असण्याची सूटट पुरुषांन ! राज्यकर्ता सद्गुणी हवा अस ! आपल्या समाजाचा आग्रह नाही पुरुष राज्यकर्ता असेल तर त्याने दुर्गुणी असायला हरकत नाही. जणू तो जन्मसिद्ध हक्की ! पण महिलेने मात्र मात्र महिला राज्यकर्ता आहे म्हणून सदगुणी असावे, असे कोष्टक आपण लावतो ! जयललिता मायादेवी या दोघींच्या निमित्तावे समाजची ही मनोवृति उघड होऊन त्यावर पुढे चर्चा होण्याला वाव निर्माण झाला आहे.

सामाजिक मनोवृति मोजण्याचा आणखी एक मापदंड म्हणजे फूलनदेवी. कुणी म्हणतात ती डाकू आणि खुनी होती म्हणून वाईट. कुणी म्हणात तिने जिद्दीने सूड घेतला म्हणून तिची बाजू योग्य. कुणाला वाटले ही माझ्यावर झालेल्या अन्यायचा पण असाट माझ्या वतीने सूड घेऊ शकेल, निदाव माझी बाजू तरी मांडू शकेल. म्हणून मग तिला लोकप्रतिनिधी म्हणून निवडूनपण दिले गेले. कुणी म्हणतात हर, हर आता ही मंत्रीपण होणार काय? तर कुणी म्हणतात का होऊ नये तिने मंत्री? पण आपण एक विसरतो सूड ध्यायला किंवा अन्ययाची बाजू जनतेपुढे प्रभावीपणे मांडायला एक धगधगणारं, जिद्दीचं आणि अशरण मन असावं लागत मग ते काही वेळा क्रूर गुन्हेगारीकडे वळतं. या उलट न्याय देण्यासाठी  राज्य चालवण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी एकाग्रपणे सुमती वापरुन, आविश्रांत परिश्रम करुन व्यवस्थेची बांधणी करावी लागत. त्यासाठी कर्तव्य न्यायबुद्धी तांत्रिक क्षमता लाते फूलनदेवीच्या लोकसभेत निवडून येण्याच्या घटनेने ही चर्चा चांगल्या अर्थाने लोकापर्यंत
रुजली तर त्यास निमित ठरलेली फूलनदेवीसुद्धा जनमानसाच्या आठणीत कायम राहील.

नवनवीन क्षेत्र

ज्यांची कर्तबगारी म्हणावी तर छोटी पण त्यांच्य वैयक्तिक जीवनात मौल्यवान आणि सामाजिक जीवनात त्या त्या क्षेत्रात प्रथम अशी नोंदवता येईल त्या म्हणजे श्रीमती सौदमिनी देखमुख ही पहिली महिला वैमानिक किंवा पहिती रेल्वे इंजिन ड्रायव्हर, पहिली नौदलातील कॅडेट ऑफिसर्सची तुकडी, पहिली ट्रक ड्राइव्हर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सरळ परीक्षा देऊन निघालेली संपूर्णपणे महिला फौजदारांची पहिली तुकडी, अशा नोंदी घेणे हे समाजाला केव्हाही मार्गदर्शक ठरणारे आहे. याच प्रकारे मुस्लिम समाजासाठी छोटया प्रमाणावर मोठया कर्तबगारीचे काम करणा-या समाजसेविका रजिया पटेल छोटया कर्तबगारीच्या पण मोठया प्रमाणावर मुस्लिम समाज ढवळून निघायला कारणीभूत झालेल्या शहनाज बानो ही नावेही समाजाच्या नोंदीत रहातील.

जाता जाता दोन बाबींचा उल्लेख करावासा वाटतो ढवळून निघाल्याने समाजात सुधारणा होतात असे मानणा-यापैकी मी आहे. म्हणूनच भारतीय नसली तरी फार लांबची नाही, अशा एका महिलेची दखल घ्यावीशी वाटते. त्या आहेत बेनजीर भुट्टो. मुस्लिं समाजाच्या अप्रगत रहाण्यामागे त्या समाजतील स्त्र्िायांना शिक्षण नसणे, स्त्र्िायांच्या कर्तबगारीला अनंत बंधनात जखडू पहाणारी मुस्लिम समाज व्यवस्था निम्म्याने कारणीभूत आहे. राजा राममोहन रॉय, कर्वे, फुले, पंडिता रमाबाई अशासारख्यांच्या प्रयत्नांतून भारतीय स्वातंत्र्लढयातील सहभागी क्रांतिकारी महिलांच्या उदाहरणामुळे हिंदू स्त्री या बंधनातून बाहेर पजत आहे. तसेच जर मुस्लिम महिलेने उभारी घ्यायाची म्हटली तर निदान लांबून बघण्यापुरता म्हणून का होईना, पण बेनजीर भुट्टो उपलब्ध आहेत.

दुसरी बाब आहे एका दुबळ्या बाजूबद्दल भारतीय स्त्र्िाया जरी लेखिका, गायिका, नायिका, साहसी, लढवय्या महणून गाजल्या असल्या तरी उद्योगपती, सेनाधिपती, समग्र प्रशासक, तत्वचिंतक अर्थशास्त्रज्ञ, वैज्ञानिक या क्षेत्रात दिंगत कीर्ती मिळवू शकलेल्या भारतीय स्त्र्िाया नाहीत. यामध्ये अपवाद फक्त थोर इतिहास संशोधक श्रीमती रोमिला थापर यांचा ! मात्र आता या पन्नास वर्षांच्या शिकवणीमुळे पुढील पन्नास वर्षांत तशाही स्त्र्िाया निर्माण होतील, अशी आपण आशा बाळगूया !
------------------------------------------------------------------------------


 





कोई टिप्पणी नहीं: